Wamanrao Pai Quotes In Marathi | Wamanrao Pai Suvichar | सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार

Wamanrao Pai Quotes In Marathi

पर्यावरण बिघडविण्यास व मानवी जीवनात सर्व समस्या, अडचणी, व्याधी, दु:ख, आपत्ती, विपत्ती अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण करण्यास एकमेव कारण म्हणजे ‘विचार प्रदूषण’ हे होय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नांत यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

पैसा कमावणे’ हे जितके महत्त्वाचे आहे त्याहुनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते ‘माणसे जोडणे’, मग ती माणसे घरातील असोत कीं घराबाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर, व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभाज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, सर्वसमर्थ, अनंतस्वरुप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

राष्ट्राच्या अपेक्षेत जीवनविद्या फक्त दोनच जाती मानते त्या म्हणजे राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही आणि विश्वाच्या अपेक्षेत जीवनविद्येला सज्जन व दुर्जन अशा दोनच जाती मान्य आहेत.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

पर्यावरण बिघडविण्यास व मानवी जीवनात सर्व समस्या, अडचणी, व्याधी, दुःख, आपत्ती, विपत्ती अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण करण्यास एकमेव कारण म्हणजे ‘विचार प्रदूषण’ हे होय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

देवासकट सर्व काही प्राप्त करुन देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

सत्कर्म हाच खरा धर्म व सत्कर्मांचे आचरण करणे हेच आहे धर्माचरण. श्रध्दा पाहिजे सत्कर्मावर आणि सबुरी पाहीजे सत्कर्माचे फळ मिळण्यासाठी.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून कोणीही वरिष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही, आहेत ते सर्व श्रेष्ठ कारण सर्वच असतात आपापल्यापरी उपयुक्त.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

परमेश्वर विश्वरुपाने समोर आहे, शरीर रुपाने जवळ आहे व सच्चिदानंद स्वरुपाने तो हृदयात आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे खरे नाही. जीवनातील 90 टक्के घटना या स्वाधीन असून फक्त 10 टक्के घटना पराधीन असतात.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

चातुर्मासांत लोक नानाप्रकारची व्रते करतात, परंतु ‘मी कोणाचेही मन दुखविणार नाही’ असा निश्चय करून ते आचरणांत आणण्याचा प्रयत्न करणे, हे सर्वश्रेष्ठ व्रत होय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून नवीन कात धारण करतो, त्याप्रमाणे हे जग जुने रूप टाकून नित्य नवीन रूप धारण करीत असते. म्हणून जग हे मिथ्या नसून मिठ्ठा आहे, नित्यनूतन आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. वास्तविक अभ्यासाला सर्व काही शक्य आहे, एवढे प्रचंड सामर्थ्य अभ्यासात आहे. म्हणून अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

माणसाच्या जीवनात जेव्हा इष्ट व चांगले घडते तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्यप्रभाव असतो, त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडते तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

अर्थाशिवाय संसार फाटका तर परमार्थाशिवाय संसार नकटा होय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

परमार्थाची तरुणांना गरज असतानाही तारुण्याच्या मस्तीत तशी गरज भासत नाही आणि उतारवयात जेक्हा गरज वाटते तेक्हा वेळ निघून गेलेली असते.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

साधनेचा दुष्काळ व शब्दज्ञानाचा सुकाळ यामुळेच परमार्थात सर्वत्र गोंधळ झालेला दिसून येतो.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

परमेश्वराचे निसर्गनियम व त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरे‚वाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

माणसांतील माणुसकी जागृत करणे’’ हाच आहे खरा धर्म, तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

राष्ट्रशत्रुंचे व समाजकंटकांचे संपूर्ण निर्दळण, हाच धर्म, तीच दया व अहिंसा तीच.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

आपल्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटीने क्यवस्था करणे हे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तक्य आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

घरादाराचा त्याग करून ब्रह्मचिंतन करणाऱया संन्याशापेक्षा प्रपंचात राहून भगवत् चिंतन करणारा गृहस्थाश्रमी सहस्त्रपटीने श्रेष्ठ होय.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

सर्व सुखाचा आराम असा जो ‘हृदयस्थ राम’ त्याचा विसर पडल्यामुळे “रमी, रम व रमा’’ या त्रयींच्या कात्रीत जीव कातरला जात आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात. संसारातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुख‚दुःख अवलंबून असते.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

सुखाला कारण विचार तर दुःखाला कारण अविचार.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

विकार ज्यांना आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव व ज्यांच्या वृत्तीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणावेत.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे व नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे; आनंद व गोविंद या दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच व तो म्हणजे ‘स्वानंद’, म्हणून जगात कोणीही नास्तिक नाही.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

ज्ञान हे शस्त्र, अस्त्र व शास्त्र आहे. ज्ञान हे शक्ती, बल व सामर्थ्य आहे. ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे. ज्ञान हा देव, ईश्वर व परमेश्वर आहे, म्हणून ज्ञानी क्हा व धन्य क्हा.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

“प्रारब्धवाद आणि पलायनवाद’’ या राहू‚केतूचे भारतीय समाजाला लागलेले ग्रहण सुटण्यासाठी प्रयत्नवाद व वास्तववाद यांची कास धरणे आवश्यक आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व वैद्यकीय मदत या पांच गोष्टी माणसाचे मूलभूत हक्क असून, हे हक्क म्हणून राष्टाच्या घटनेत समाविष्ट केले पाहिजेत, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टीकोन आहे.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

हिंदुस्थानातील लोकांची तीन दैवते आहेत किंवा असावयास पाहिजेत. एक भगवान श्रीकृष्ण, दुसरे आर्य चाणक्य व तिसरे छत्रपती शिवाजी महाराज.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

मूर्ख माणसे मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट पहातात तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता या दोन्ही बाजूस सारून जो केवळ वर्तमानकाळात स्थिर रहातो तो स्थितप्रज्ञ.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला ‘जीवन’ असे म्हणतात.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे परमेश्वर, प्रतिष्ठान आहे शरीर व जीवन जगणे, हे आहे त्याचे अनुष्ठान.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱयाचा अहंकार जपणे’ ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

आपली गृहलक्ष्मी ही ऐश्वर्यलक्ष्मीला आमंत्रण देणारी महालक्ष्मी होय.
.

– वामनराव पै


Wamanrao Pai Quotes In Marathi

‘विश्वप्रार्थना’ हा सर्व चिंता नाश करणारा चिंतामणी, सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू, सर्व संकल्पसिद्ध करणारा कल्पतरु व जीवनाचे सोने करणारा परीस आहे.

– वामनराव पै


हे देखील वाचा

मराठी सुविचार संग्रह

 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment