Bollywood Jokes in Marathi | बॉलीवुड मराठी जोक्स

Bollywood Jokes in Marathi | बॉलीवुड मराठी जोक्स

If you Looking for Best Bollywood Jokes in Marathi then you have come to the right website. In this article we have shared all 400+ Bollywood Jokes in Marathi.

एकदा रजनीकांत ने एका छोट्या मुलाला रक्तदान केले . . . . . .

आज त्या मुलाला लोक “द ग्रेट खली” म्हणून ओळखतात….


रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो,

त्यावेळी तो स्वत:ला वर उचलत नाही, तर पृथ्वीला खाली ढकलत असतो.


Marathi jokes android app
Marathi jokes android app

चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?..

कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!


रजनीकांत तिस-या इयत्तेत शिकत असताना

त्यांची रफ नोट वही चोरीला गेली.

तीच वही आज विकिपीडिया नावाने प्रसिद्ध आहे.


रजनीकांत एकदा चहा पीत होता….

अचानक त्याने चाकू काढला आणि चहाचे २ तुकडे केले….

आणि …तेव्हापासूनच कटिंग चहा सुरु झाला…


एकदा रजनीकांत पाणी गरम करायला ज्वालामुखीवर गेला

आणि तिकडे बेशुद्ध पडला का ????
.
.
.
.
कारण त्याने तिकडे पाहिल की
मकरंद अनासपुरे ज्वालामुखीवर पापड भाजत बसला होता …..


एकदा मकरंद अनाजपुरे कुत्र्याचे शेपूट पाईपमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता.

तेवढ्यात रजनीकांत तिथे येतो,
रजनी: अय्यो, अरे रे मकू… कुत्र्याच शेपूट कधी सरळ होत नसत.

मक्या: अरे गप् रे रताळ्या, मी पाईप वाकवतोय ..


रजनी आणी मकरंद अनांसपुरे यांच्या फँन्स मधील संवाद –

रजनी फँन: आमचा रजनी i pod ते i pad कॉल लावु शकतो…आता बोला.

मक्या फँन: APPLE च्या लोगोतिल अर्धे सफरचंद मक्यानेच खाल्लय…आता बोला


एकदा शाहरुख खान ,अमिताभ बच्चन,
रजनीकांत आणि मकरंद अनासपुरे विमानातून जात असतात.

काही तांत्रीक अडचणींमुळे विमानात बिघाड होते.विमानात फक्त तीनच पँराशुट असतात.

शाहरुख बोलतो मी या देशातला सगळ्यात चांगला नट आहे
माझी या देशाला गरज आहे, मग तो पँराशूटनी उडी मारतो

. रजनीकांत बोलतो मी या देशातला लोकप्रीय अभीनेता आहे
माझी या देशाला गरज आहे…मग तो ही उडी मारतो

अमिताभ बच्चन मकूला बोलतो आता तु उडी मार ..
मकू बोलतो पण या विमानात अजून दोन पँराशूट आहेत

कारण………..त्या रताळ्या रजनी ने माझी गोधडी घेऊन उडी मारली……

होंहों…हों……हों…..


रजनी : माझ्या साठी ह्या जगात सर्व काही शक्य आहे ….
मकू : आस म्हणतो का रे राताळ्या…
मग मला एका गोलाकार खोलीत कोपरयात बसून दाखव….

होंहों…हो…हो


रजनी : मकू मला सांग पहिले कोंबडी आली का अंड?

मकू : होहो……हो….हो , आय डोन्ट नो रे बाबा …

रजनी : सरव्यात आधी कोंबडा आला … मग त्याने शिट्टी मारून कोंबडीला बोलावल
….. मग family planning केली आणि मग अंड आल…..

ह्या वेळी रजनी rocks मकू shocks …..


रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी”अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!

मक्या: हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,

मग काय माझं एक दोस्त व्हता, ‘प्रकाश’नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.

पण पुढे तो पावसात भिजला नि विझला…

रजनीकांत: मग काय केलं?

मक्या: काय नाय, एक मैत्रीण पण होती….’ज्योती’नावाची. .. ..


रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी
एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज

‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.


मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती.
तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला.

भिकारीः ताई, एक रुपया द्या.

मल्लीकाने त्याला एक हजार रुपये दिले.
तिच्या सेक्रेटरीने विचारले, त्या भिकार्‍याला एक हजार रुपये का दिलेस?

मल्लीका म्हणालीः पहिल्यांदाच कोणीतरी ताई म्हणाले……


सोनी टी.वी वरील सी आय डी मालीकेचा पुणेकरांवरील प्रभाव”

दरवाज्यावरील पाटी: ‘घराची कील्ली शेजारी आहे.
तुम्ही सी आय डी मधुन असाल तर आपले ओळखपत्र दाखवून कील्ली घ्यावी.

उगाच ताकद आहे म्हणून दरवाजा तोडायची गरज नाही…


नेटवर्क प्रोब्लेममुळे वैतागलेला रजनीकांत मोबाईलचा tower उखडून फेकायला जातो.
पण तिथे tower न दिसल्यामुळे आणखी चिडतो.

तेवढ्यात त्याच्या लक्षात येत.

.
.
.
मकरंद अनासपुरे त्या tower नि कान कोरत असतो.
“अरे सॉरी रजन्या, कान लैच खाजवायला.”


टच स्क्रिन ची संकल्पना भारतात सर्वप्रथम कुणी मांडली?

.
.
.
दादा कोंडके यांनी 1978 मध्ये
.
.
.
बोट लावीन तिथं गुदगुल्या………..


गब्बर: ‘‘ये हात मुझे दे दे ठाकूर’’……….

ठाकूर: (वैतागून) घे, माझे हात घे, विरूचे हात घे, जयचे हात घे, बसंतीचे.

पण हात घे……सगळे हात गोळा कर आणि दुर्गामाता बन……

गब्बर: माफ कर यार, तू तर खूपच सेंटीमेंटल झालास


एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो.
धर्मेद्रला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो. ”कुत्ते…कमीने!”

चोर शांतपणे म्हणतो, ठिक आहे, कमी नेतो!


दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले.

“आयच्या आयची आय ब्यांक “


सोनिया कौन बनेगा करोडपतीमध्ये गेल्या ….

अमिताभ: सोनिया जी, आता शेवटचा प्रश्न, 5 कोटी रुपयांसाठी.

गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे ?

आणि तुमचे ऑप्शंस आहे…
पहिला- नीतीश कुमार
दुसरा- पृथ्वीराज चव्हाण
तिसरा- सिद्दरमैया
चौथा- नरेंद्र मोदी

सोनिया: नरेंद्र मोदी.

अमिताभ बच्चन: काय तुम्ही श्योर आहात? तुम्ही दिलेलं उत्तर लॉक करायचं ?

सोनिया: जर तुम्ही खरंच यांना लॉक करू शकत असाल,
तर मी तुम्हाला 100 कोटी देईन.


सलमान खान राम कदमांच्या भेटीला

बच्चन कुटुंबियात भीतीच वातावरण


कर्म म्हणजे काय?

राज कपूरनं नरगिसला फेमस केलं आंणि आता
नरगिसचा मुलगा संजू यानं राज कपूरचा नातू रणबीर कपूर याला फेमस केलं.

“याला म्हणतात कर्मचक्र”


विराटच्या लग्नात फक्त 50 पाहुणे होते…..

एवढे तर आमच्याकडे रुसून बसतात…


विजय माल्याची तिसरी बायको, पिंकी लालवानी चा लग्नातला उखाणा..*

स्टेट बैंकेच्या कुलुपाला नमस्कार करते वाकून आणि

विजय रावांचे नाव घेते किंग फिशर स्ट्रॉन्ग टाकून


एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो.

त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात,

नाना: ‘भाऊ कसं काय झालं हे?‘
भाऊ: समोर एक माणूस आडवा आलता.

नाना: लेका मग उडवायचाना त्याला रेल्वे कशाला उसात घातली!‘
भाऊ: आरं बाबा त्यालाच उडवत होतो..,

पण…तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर काय करणार…


गूरूजी-बंड्या मला सांग Golmal Again मध्ये करीना कपुर ला का नाही घेतल.

बंड्याचे उत्तर ऐकून गुरुजी शाळा सोडून फरार

बंड्या- करीना कपूरच बाळ काय तूम्ही संभाळणार आहे का??


टीचर: बतावो, रजनीकांत कि फिल्म “द रोबोट” से तुमको क्या सीख मिली….

स्टुडंट्स: सर,लडकी सिर्फ आदमी का नही, मशीन का भी दिमाग खराब कर सकती है!!!


रिजर्वेशन तो ऑनलाइन होता है, इसमें आंदोलन क्या करना…..

…Alia Bhatt


 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment