Information About Television (TV) in Marathi | टेलिव्हिजन बद्दल महत्वाची माहिती

Information About Television (TV) in Marathi | टेलिव्हिजन बद्दल महत्वाची माहिती

जगामध्ये असे खूप च कमी घर असतील ज्यांच्याकडे टेलिव्हिजन नाही आहे. काही घरांमध्ये तर २ किव्हा त्यापेक्षा अधिक TV असतात. एकाहून अधिक फीचर्स आणि HD रिसोल्युशन वाले TV आता आपल्याला घरात बसून पूर्ण जगाची माहिती देतात. TV चा विकास १८३० पासून सुरु झाला होता, जेव्हा ग्राहम बेल आणि थॉमस एडिसन यांनी आवाज आणि फोटो ट्रान्सफर करून दाखवले होते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला टेलिव्हिजन बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत.

१. १९०७ मध्ये पहिल्यांदा “Televison” हा शब्द अस्तित्वात आला आणि हा शब्द डिक्शनरी मध्ये जोडण्यात आला.

२. १९२४ मध्ये पहिल्यांदा जॉन ब्रेड यांनी छायाचित्र हलवून दाखवले.

३. १९३३ मध्ये आठवड्यातून २ वेळा प्रोग्राम TV वर यायला सुरवात झाली.

४. १९३६ मध्ये १२ इंचाच्या TV स्क्रीन सोबत खूप मोठे मोठे उपकरण लावावे लागत असे.

५. दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यात टेलिव्हिजन चा वापर वाढू लागला. त्या काळामध्ये टेबलटॉप आणि कंसोल असे दोन प्रकारचे मॉडल खूप प्रचिलित झाले होते.

६. पूर्ण पणे कलर TV चा प्रसारण १९५३ मध्ये अमेरिका मध्ये सुरु झाला.

७. १९५६ मध्ये रॉबर्ट एडलर यांनी पहिला रिमोट कंट्रोल बनवला.

८. १९६२ मध्ये “AT & T” या कंपनीने टेलिस्टार लाँच केला .

९. १९६७ पर्यंत सगळे प्रोग्राम कलरफुल यायला सुरवात झाली होती.

१०. १९६९ मध्ये “Apollo ११” हा पहिला प्रोग्राम ब्रॉडकास्ट झाला. जो ६०० मिलियन लोकांनी बघितला.

११. १९७३ साली TV ची स्क्रिन मोठी करण्यात आली. या काळामध्ये TV चा वजन खूप जास्त होत असे.

१२. १९७६ साली भारतात TV प्रसारण ऑल इंडिया रेडिओ पासून वेगळे करण्यात आले.

१३. १९८० साली TV सोबत VCR तसेच गेम्स अस्तित्वात आले. यामुळे TV ची प्रसिद्धी आणखीनच वाढली.

१४. १९९० नंतर टेलिव्हिजन मध्ये खूप बदलाव आले. TV ची साईज आणि क्वालिटी खूप चांगली झाली . याच काळामध्ये LCD आणि प्लास्मा सारख्या नवीन टेकनॉलॉजीवर प्रयोग चालू होते.

१५. २००० नंतर VCR च्या जागी DVD प्लेअर चा वापर वाढला. खूप सारे कमर्शिअल चॅनेल आले आणि TV चा स्वरूप पूर्णपणे बदलला.

१६. आत्ताचा जमाना स्मार्ट TV चा आहे . अल्ट्रा UHD, बेन्डेवल, 4K, 3D, LCD/LED टीवी आता फक्त मनोरंजनासाठी न्हवे तर कॉम्पुटिंग आणि कनेक्टिविटी साठी सुद्धा वापरात घेऊ जाऊ लागले आहेत.

१७. १९९७ मध्ये एका माकडाला TV चा एंटीना चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

१८. एक व्यक्ती प्रत्येक महिन्याला अंदाजे १७५ तास TV बघतो.

१९. तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेमधील ४ मधला एक व्यक्ती कधी ना कधी तरी TV वर आला आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment