10 Highest Paying Indian Govt Jobs in Marathi | सगळ्यात जास्त पगार असलेल्या १० सरकारी नोकऱ्या

10 Highest Paying Indian Govt Jobs in Marathi | सगळ्यात जास्त पगार असलेल्या १० सरकारी नोकऱ्या

तुम्हाला सुद्धा जास्त पगार असलेली सरकारी नोकरी करायची आहे का?

जर तुमचे उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही अचूक आर्टिकल वर आलेले आहात. लक्षात ठेवा मित्रांनो आज काल सरकारी नोकरी पेक्षा जास्त पगार असलेले जॉब्स सुद्धा आहेत. पण सरकारी नोकरी ती सरकारी नोकरी. चला तर जाणून घेऊया सगळ्यात जास्त पगार असेलेल्या १० सरकारी नोकऱ्या.

१. इंडियन सिविल सर्व्हिसेस – Indian civil service
इंडियन सिविल सर्व्हिस जसे कि IAS, IPS आणि IFS आपल्या देशातील सगळ्यात मोठ्या आणि मत्त्वपूर्ण सरकारी नोकऱ्या आहेत. प्रत्येक वर्षी खूप मुले सिविल सर्व्हिसेस ची परीक्षा देतात आणि त्यातील खूप कमी मुले या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. हि सगळ्यात कठीण परीक्षा आहे पण हा जॉब सगळ्यात जास्त सन्मान असलेला जॉब आहे. हा जॉब करणाऱ्यांचा पगार प्रति महा 2 लाखांपेक्षा जास्त असतो. आणि एवढेच नाही तर सिविल सर्विस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर, गाडी, ड्राइवर यांसारख्या सुविधा सरकार द्वारा प्रदान केल्या जातात.

2. डिफेंस सर्विसेस – Defence Services
डिफेंस सर्विसेस मध्ये आर्मी, नेवी, एअर-फोर्स यांसारखे जॉब येतात. यांपैकी कोणताही जॉब करणे म्हणजे एक सन्मानच आहे कारण यांमध्ये काम करणारेच आपल्याला शत्रूंपासून वाचवतात. डिफेंस सर्विसेस साठी वेग-वेगळ्या परीक्षा असतात जसे कि NDA, CDS, F-CAT. या जॉब मध्ये सालेरी सुद्धा खूप चांगली भेटते. महिन्याला तुम्ही ५० हजार ते १ लाखापर्यंत कमाई करू शकता. या जॉब मध्ये प्रमोशन मिळण्याचे चान्सस खूप जास्त असतात.

3. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग पीएसयू – Public sector undertakings
मित्रांनो जर तुम्हाला private sector आवडत असेल तर PSU तुमच्या साठी खूप चांगला ऑप्शन आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये आपल्या सरकारच्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जसे कि BHEL, ONGC,IOC. या कंपन्या मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला GATE ची परीक्षा द्यावी लागते. या कंपन्या मध्ये तुम्हाला प्रति महा चाळीस हजार ते डिड लाखांपर्यंत पगार भेटू शकतो .

4. यूनिवर्सिटी प्रोफेसर – University Professor
असे बोलले जाते कि मुलांना शिकवण्याच काम जगात सगळ्यात सोपे आणि आरामदायी आहे. आणि म्हणूनच प्रोफेसर ची नोकरी कोणत्याही सरकारी सेक्टर मध्ये सगळ्यात चांगली. आणि या जॉब मध्ये तुम्हाला मान-सन्मान सुद्धा भरपूर भेटतो. जर का तुम्ही NIT किव्हा IIT सारख्या कॉलेजेस मध्ये प्रोफेसर असाल तर तुम्हाला सेलरी खूप चांगली भेटेल. आणि जर का तुम्ही उच्च शिक्षण घेऊन PHD केली असाल तर तुम्हाला खूप चांगली सेलरी भेटू शकते. कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी मध्ये शिकवायला तुम्हाला ४० हजार ते १ लाख पर्यंत पगार भेटू शकतो. या व्यतिरिक्त मेडिकल आणि राहायला घर सुद्धा सरकार द्वारा दिले जाते.

5. बँकिंग Banking
जेव्हा बँकिंग बद्दल बोलले जाते तेव्हा तुम्हाला RBI, गव्हर्नर, प्रोबेशनरी ऑफिसर या सगळ्यांची नावे समोर येतात. आणि सगळ्यांनाच यामधले काही ना काही बनायची इच्छा असते. कारण बँकेमध्ये प्रोमोशन पटपट भेटतात आणि प्रोमोशन सोबत तुमचा पगार पण पटपट वाढत जातो. या लोकांना जवळजवळ १८ लाखा पर्यंत वार्षिक शुल्क भेटते. या व्यतिरिक्त बँक तुम्हाला राहायला चांगले घर देते, तसेच प्रत्येक 2 वर्षा मध्ये बाहेर फिरण्यासाठी १ लाख रुपये व मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा बँके द्वारे मदत केली जाते.

६. शास्त्रज्ञ Scientist
जर का तुम्ही सरकारी संस्था जसे कि डीआरडीओ(Defence Research and Development Organization) मध्ये इंजिनीयर किव्हा शास्त्रज्ञ आहेत तर मग समजा कि तुमचं नशीब खूप चांगले आहे. अशा ठिकाणी काम केल्याने तुम्हाला हवे ठेवढे पैसे व खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात. या ठिकाणी बेसिक सेलरी ४०,००० ते ६०,००० पर्यंत असते. आणि हि सेलरी तुमच्या पोस्ट सोबत वाढत-वाढत जाते. या व्यतिरिक्त तुम्हाला ७ ते १० हजार रुपये ट्रान्सपोर्ट चार्ज, मेस मध्ये फ्री जेवण, राहायला घर तसेच दर ६ महिन्यात बोनस सुद्धा भेटतो.

७. असिस्टेंट इन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स Assistant in Ministry of External Affairs
या कामाला भारता मध्ये खूप सन्मानजनक मानले जाते. आणि या कामामध्ये पैसे पण भरपूर भेटतात. या कामामध्ये अनेकदा तुमची पोस्टिंग बाहेरच्या देशा मध्ये होते, ज्या ठिकाणी महिन्याला अगदी तुम्ही 2 लाखा पर्यंत शकता. परंतु यासाठी खूप कठीण परीक्षा पास करावी लागते. या जॉब साठी तुम्हाला SSC CGL ची परीक्षा पास करावी लागते.

८. सरकारी डॉक्टर Government Doctor
सरकारी डॉक्टरांची गरज तर नेहमीच असते कारण कोणत्याही सरकारी दवाखान्या मध्ये तुमचा उपचार कमीत कमी पैशामध्ये होते. परंतु इतर खाजगी हॉस्पिटल पेक्षा सरकारी डॉक्टरांचा पगार जास्त असतो. MMBS नंतर तुम्ही कोणत्या हॉस्पिटला नोकरी करता यावर तुमची सेलरी अवलंबून असते. आजकाल सरकार सुद्धा 2५% ते ५०% जास्त वेतन त्या डॉक्टरांना देते जे शहरापासून लांब जाऊन गावामध्ये लोकांची सेवा करतात. एका सर्जनला भारतामध्ये १ महिन्याची जवळजवळ १ ते 2 लाख पर्यंत सेलरी भेटते व एका जूनियर डॉक्टरला एका महिन्याची ४० ते ५०,००० पर्यंत सेलरी भेटते.

How to become doctor in Marathi

९. इनकम टैक्स ऑफिसर Income Tax Officer
आयकर विभागामध्ये नोकरी साठी प्रत्येक जण प्रयन्त करत असतो कारण या नोकरी मध्ये पैशासोबत मान-सन्मान सुद्धा भेटतो. या नोकरी मध्ये तुम्ही इनकम टैक्स ऑफिसर पासून सुरवात करत कमिश्नर पर्यंत पोचू शकता. आणि महिन्याला आरामात ६०,००० ते १,००,००० पर्यंत कमवू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला सरकारी गाडी, ३० लिटर पेट्रोल, सिम कार्ड या सारख्या सुद्धा सुविधा दिल्या जातात. आयकर विभागामध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला SSC CGL ची परीक्षा पास करावी लागते.

१०. रेलवे इंजीनियर Railway Engineer
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि रेलवे इंजीनियर चा पगार हा इतर सरकारी इंजीनियर पेक्षा जास्त असतो. यांची एका महिन्याची सेलरी ६०,००० ते ८०,००० पर्यंत असते. या व्यतिरिक्त यांना घर, प्रवास भत्ता आणि वेगवेगळे इंसेंटिव सुद्धा सरकार द्वारे दिले जातात.

तर मग मित्रानो तुम्हाला देशाची सेवा करायची संधी भेटली तर तुम्ही कोणते काम करायला आवडेल कंमेंट मध्ये नक्की सांगा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “10 Highest Paying Indian Govt Jobs in Marathi | सगळ्यात जास्त पगार असलेल्या १० सरकारी नोकऱ्या”

Leave a Comment