Spiritual Quotes in Marathi | Spiritual Marathi Suvichar आध्यात्मिक मराठी सुविचार

Spiritual Quotes in Marathi | Spiritual Marathi Suvichar आध्यात्मिक मराठी सुविचार

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.

श्रद्धेची मुळे हृदयात असतात,
जिभेच्या टोकावर नसतात.

मी देव मानतो पण माणसात राहणारा.

पाण्याला बंध घातला तर ते “संथ” होते,
आणि मनाला बंध घातला तर “संत” होतात.

प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले वायरलेस कनेक्शन आहे.

देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे
म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात
प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर
मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात.

थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही,
तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.

एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत,
हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो
आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.

कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा;
भक्ती म्हणजे सेवाभाव .

कोमलता हा ह्रदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म.
देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि ह्रदयाला फ़ुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे;
जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..

जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,
तर त्याच्याकडे काही मागू नका.
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.

ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय .

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.

तीन गोष्टी सतत देत राहा-मान, दान आणि ज्ञान.

केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.

एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत,
हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो
आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

अन्न म्हणजे देव आहे,
म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका.

अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .

अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे

देव कुठे शोधणार?
जर तो तुम्हाला आपल्या हृदयात व जिवंत प्राण्यात दिसत नसेल
तर तो कुठेही भेटणार नाही.

देवळे आणि धर्म नष्ट झाल्यानंतर
ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो.

देवाने एक दरवाजा बंद केला,
तरी तो हजारो दरवाजे उघडतो.

देवाला कोणताच धर्म नसतो.

देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा.
कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छेपेक्षा मोठी असेल.

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो
जो अत्यंत शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो
त्याला ती निश्चित पणे मिळत असते.

परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी
हे दोन गुण असतील तेव्हाच.

देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना.
पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.

जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे

प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ जाण्याची शक्ती.

प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे,
तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.

आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि ‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे..

जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले।
तोची साधू ओळखावा।
देव तेथेची जाणावा॥

मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द

अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

अन्न म्हणजे देव आहे,
म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका.

अपराध करून जो सुख मिळवतो
त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे
आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.

आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे.

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

मनाचा लय झाल्यावर परमानंदाचा अनुभव येतो
व हे योगसाधना केल्यावरच शक्य होते.

भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते.
पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका.
परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ! – संत तुकाराम.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक, शरीराला जेवढे आवश्यक आहे,
तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.

परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो
अत्यंत शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो
त्याला ती निश्चित पणे मिळत असते.

परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे
त्याच्या मनाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Spiritual Quotes in Marathi | Spiritual Marathi Suvichar आध्यात्मिक मराठी सुविचार”

Leave a Comment