नवरीचे उखाणे | Marathi Ukhane For Female | Ukhane in Marathi for female 2024

Marathi Ukhane For Female । नवीन मराठी उखाणे नवरीसाठी 2024

Marathi Ukhane For Female: उखाणा घे उखाणा घे!! लग्न असो किव्हा एखादे कार्यक्रम आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये उखाणा घेण्यासाठी सर्वच जोर देत असतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही निवडक Marathi Ukhane For Female घेऊन आलो आहोत.

या ukhane in Marathi for female लेखामध्ये सुंदर सुंदर नवविवाहित नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणे सुद्धा सामायिक केलेले आहेत. त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या लग्नाची तयारी करत असाल तर खालील Marathi Ukhane List मधील काही उखाणे नक्की लक्षात ठेवा. या Marathi Ukhane For Girls संग्रहामधील Marathi Ukhane तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हे उखाणे तुमच्या मैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

तुम्ही जर का modern Marathi ukhane for female, smart Marathi ukhane female तसेच Marathi ukhane for female funny च्या शोधात असाल तर आम्ही या उखाण्यांचा देखील या पोस्ट मध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे आत्ताच यातील एक-दोन उखाणे तोंड पाठ करा आणि आपल्या सासरच्या माणसांना प्रभावित करा.

Marathi ukhane for bride | नवरीसाठी नवीन मराठी उखाणे

Marathi ukhane for bride
Marathi ukhane for bride

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची मी सून

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी

मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
….. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम

Smart Marathi Ukhane Female । महिलांकरिता स्मार्ट उखाणे  2024

Smart Marathi Ukhane for Female
Smart Marathi Ukhane for Female

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून

काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती

Ukhane in Marathi for female | नवरीसाठी नवीन उखाणे

Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane For Female

झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची

सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
—— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
—— रावांचे नाव घेऊन सोडले काकण

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
——रावांना भरविते जिलेबिचा घास

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
—— रावांचे नाव घेते—— ची मी सुन

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
——रावांचे नाव घेते ऐका सारेजण

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
——रावांचा संसार हा सुखाचा कळस

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
—— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
—- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात

वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,
….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,
….. रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
….. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब

भोळ्या शंकराला बेलाची आवड,
….. रावांची पती म्हणून केली मी निवड

रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास

एक तीळ सातजण खाई,
…. रावांना जन्म देणारी धन्य ती आई

Marathi Ukhane For girls 2024

Marathi Ukhane For girl
Marathi Ukhane For girl

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….. रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले

फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती,
….. रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी

दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,
….. रावांचे नाव घेऊन, बांधते मुंडावळी

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,
…. रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू,
….. रावां ना घास देताना येते मला गोड हसू

मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,
….. रावां मुळेच आला माझ्या जीवनाला अर्थ

संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले,
….. रावां ची मी आज सौभाग्यवती झाले

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
….. रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात,
….. रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात

अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
…..रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुडा

काचेच्या बशीत बदामचा हलवा,
….. रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
….. च्या घराण्यात ….. रावांची झाले महाराणी

अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण,
वरणावर तुप, तुपासारखे रुप, रुपासारखा जोडा,
….. रावांचे नाव घेते वाट माझी सोडा

हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र,
….. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र

काव्य आणि कविता, सागर आणि सरिता,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे

साँजवात लावताना येते माहेरची आठवण,
….. रावांसाठी झाली माझी सासरी पाठवण

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान,
….. रावांची राणी झाले, आहे मी भाग्यवान

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
….. रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

साता जन्माच्या जुळल्या गाठी,
….. रावांचे नाव घेते चालताना सप्तपदि

जाईजुईचा वेल पसरला दाट,
…..रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ

मंद मंद वाहे वारा, संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …..रावां आणि …..ची जोडी

काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन,
….. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन

निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे,
….. रावांच्या संगतीने उजलेल् माझे जीवन सारे

श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य,
….. राव आणि माझ्या संसारात होईल, तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य

उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने ….. रावां सारखे पती लाभले मला

चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,
…..रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी

जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते,
सगळ्यांचा मान राखून नाव ….. रावांचे घेते

शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,
….. रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात

सरिते वर उठतात तरंग, सागरावर उठतात लाटा,
….. रावांच्या सुख-दुखात अर्धा माझा वाटा

लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर,
…..रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर

सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
….. रावांचे नाव घेण्यास सगळ्यांनी अडविले

भाव तेथे शब्द, शब्द तेथे कविता,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता

निरभ्र आकाशात चंद्राची कोर,
….. रावांचे नाव घेते, भाग्य माझे थोर्

Ukhane in Marathi for female marriage 2024

Marathi Ukhane For Bride
Marathi Ukhane For Bride

लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विद्या शोभते विनयाने,
…… च नाव घेते तुमच्या आग्रहाने.

आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……. च नाव घेते तुमच्या आग्रहाने.

संसाराच्या देवार्यात नंदादीप तेवतो समाधानाचा,
…… चे नाव घेऊन मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

चांदीच्या तबकात खडीसाखरेचे खडे,
…… च नाव घेते…… पुढे.

नीलवर्णी आकाशात चमकतात चांदण्या,
…… च नाव घेते…… ची कन्या.

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित,
…… ना दीर्घायुष्य मागते नातेवाईका सहित.

मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर-माहेरचा,
…… नाव घेऊन मान राखते सर्वांचा.

संसाराच्या देवार्यात नंदादीप तेजावा समाधानाचा,
…… पाठीशी आशीर्वाद असावा तुमचा.

अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र,
…… हाती माझे जीवन सूत्र.

लग्नासाठीचे मराठी उखाणे

शशी रजनी, रवी उषेची नियतीने बांधली जोडी,
…… च्या संसारात आहे प्रेमाची गोडी.

संसाराच्या अंगणात सुख दुःखाचा खेळ अविनाशी,
…… चा उत्कर्ष होवो हेच मागणे देवा पाशी.

गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व,
…… पती मिळाले यात आले सर्व.

दया, क्षमा, शांती तेथे लक्ष्मीचा वास,
…… च नाव घेते तुमच्यासाठी खास.

परिजात अंगणात, रांगोळी दारात,
…… च नाव घेते…… च्या घरात.

कमल फुलांचा हार महालक्ष्मीच्या गळ्यात,
……. च नाव घेते सुवासिनी च्या मेळ्यात.

सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला,
……. सुखी राहत हा आशीर्वाद द्यावा मला.

लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती,
…… पति मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी,
…… च नाव घेते खास…… साठी.

नागपंचमी च्या सणाला, सख्या पुजती वारुळाला,
…… विना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.

थोर कुळात जन्मले, संस्कारात वाढले,
…… च्या जीवावर भाग्यशाली झाले.

नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,
……. च नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा.

प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी, जीवनाचे
पुष्प वाहिले,…… च्या चरणी.

आई-वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस,
…… पती मिळावे म्हणून खूप केले नवस.

नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा,
…… च्या संसारी असाव्या सर्वांच्या शुभेच्छा.

हळद लावते किंचित, कुंकू लावते ठस ठासित,
…… पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित.

हिरकणी बुरुज अमर झाला मातेच्या वात्सल्याने,
…… नाव घेते आग्रह पेक्षा प्रेमाने.

नैवेद्य नेला नामदेवाने, विठ्ठलाने खाल्ला घास,
…… च नाव घेते…… साठी खास/तुमच्यासाठी खास.

बाल्य गेलं माता-पित्याच्या पंखाखाली,
तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ,
संसाराच्या वळणावर मिळाला,
…… चा प्रेमळ हात.

स्वाती नक्षत्रातील थेंबांचे शिंपल्यात होती मोती,
……. मिळाले पत्ती म्हणून ईश्वराशी आभार मानू किती.

देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
……. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.

आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास,
……..नाव घेते तुमच्यासाठी खास.

Marathi Ukhane List | Best Marathi Ukhane for girls 

New Marathi Ukhane
New Marathi Ukhane

उभी होते तळ्यात, नगर गेली मळ्यात,…….हजाराची कंठी,
…………. रावांच्या गळ्यात.

नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण,
…….. साठी मागितले दीर्घायुष्याचे दान,

मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते,
…………चे पत्नी पद अभिमानाचे मिरवते.

नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय,
……….च्या सहवासात जीवन झाले सुखमय.

शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.

कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मीच्या गळ्यात,
………चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात.

रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,
………..चं नाव घेते ……..सणाला

सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.

निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,
………… चा व माझा संसार आहे सुखाचा.

भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,
……….चं नाव घेते ………. दिवशी.

गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,
……..रावांच नाव घेते ……..दिवशी.

Best Marathi Ukhane for female

भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,
………… नाव घेते सर्वांच्याकरिता.

संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,
जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.

दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,
……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.

सतारीचा नाद, वीणा झंकार,
……….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.

प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग
जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.

तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून,
……..रावांचं नाव घेते तुमचा मान राखून,

दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….. रावांच्या नावाला रात्र झाली फार.

दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….रावांच्या नावाला आग्रह नको फार.

आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्या सहवासात वाढले,
……….मुले मला सौभाग्य चढले.

काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
….. रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद

आकाश आले भरुन, चंद्र लपला ढगात,
………… ना हार अर्पण करून धन्य झाले जगात.

विहिरी भरल्या काठोकाठ नदीला आला पूर,
………… च्या साठी आई-वडिल केले दूर.

शुभ मंगल प्रसंगी सर्वजण करतात आहेर,
……… च्या जीवनाकरिता सोडले मी माहेर.

प्रेमरूपी संसार, संसार रूपी सरिता,
…………. चं नाव घेते खास तुमच्याकरिता.

भारताच्या नकाशाला मोत्याचे तोरण,
……..चं नाव घ्यायला…….कारण.

चांदीच्या तबकात निरंजन आरती,
…….च्या जीवनात …….. सारथी.

सुख समाधान, शांति हेच माझे माहेर,
……… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

Marathi ukhane for bride | नवरीसाठीचे मराठी उखाणे

New marathi Ukhane image
New marathi Ukhane image

सौंदर्याच्या बागेत सूर्यनारायण माळी,
…….चे नाव घेते ……….. वेळी.

हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्राचा धरीन अभिमान,
……..रावांबरोबर झाले शुभमंगल सावधान.

उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ दर्जा शेतीचा,
…….नी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा.

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
……….. शी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.

संसाररूपी सागरात पती असतो माळी,
……….. चं नाव घेते ……..वेळी.

उदार मनाने अहिंसेच्या जगाला करा आहेर,
……..च्या करिता सोडून आले माहेर.

लतावेलींच्या सौंदर्याने नटला हिमगिरी,
…….चे नाव घेते …….च्या घरी,

संसाराच्या सुखस्वप्नाची स्त्रीच्या मनी आस
…………..चे नाव घेते तुमच्याकरिता खास.

शरदाचे चांदणे मधुवनी फुले निशिगंध,
…….ची नाव घ्यायला मला वाटतो आनंद,

श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान,
…….रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान.

उत्तर दिशेला चमकतो अढळ ध्रुवतारा,
…….चा उत्कर्ष हाच माझा अलंकार खरा.

अरुण रुपी उषा येता सोन्याची प्रभा पसरली,
……… चं नाव घ्यायला मी नाही विसरली.

गोपाळ कृष्ण आहे बासरीचा छंद,
…………चे नाव घेण्यात मला वाटतो आनंद.

पतिवृत्तेचा धर्म नम्रतेने वागते,
…….राव सुखी राहोत हा आशिर्वाद मागते.

मंगळसूत्र म्हणजे सासर माहेरची प्रीती,
……. मिळाले पती म्हणून आभार मानू किती.

प्रीतीच्या झुळकेनं कळीचे फूल झालं.
…….च्या संगतीनं जीवन सार्थक झालं.

सुख, समाधान, शांति तेथे देवाची वस्ती.
…………ना अयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.

अगं अगं मैत्रीणीबाई, तुला सांगते सर्व काही,
………… राव मिळाले तरी तुला विसरत नाही.

निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी
……….. चं नाव घेते खास तुमच्यासठी.

पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा,
……… चं नाव घेते वाट माझी सोडा.

पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब,
………..चे नाव घेण्यास लावत नाही विलंब.

मंडपाला सोडल्या कमानी त्यावर विजेची रोषणाई,
………चे नाव ऐकण्याची एवढी कसली घाई.

आई-वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस,
…… पती मिळावे म्हणून खूप केले नवस.

प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी, जीवनाचे
पुष्प वाहिले,…… च्या चरणी.

नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,
……. च नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा.

थोर कुळात जन्मले, संस्कारात वाढले,
…… च्या जीवावर भाग्यशाली झाले.

नागपंचमी च्या सणाला, सख्या पुजती वारुळाला,
…… विना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.

विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी,
…… च नाव घेते खास…… साठी.

लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती,
…… पति मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

आईच्या प्रेमाची सर नाही कुणाला,
…….चे नाव घेते सांगाल त्या वेळेला.

सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
…….. चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

जगाचे अंगण, मनाचे वृंदावन,
………. रावांचे नाव हेच माझे भूषण.

सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान,
……… चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

लक्ष्य दया

जर तुम्ही लग्नाची तयारी करत असाल तर त्यापूर्वी सर्वात महत्वाचे Marathi ukhane for female या लेखातील एक तरी उखाणा नक्की पाठ करा नाहीतर सासरची माणसे तुम्हाला सोडणार नाहीत.

तरी मला आशा आहे मैत्रिणींनो ukhane in Marathi for female या लेखामधील सुंदर सुंदर ukhane Marathi for female तुम्हाला आवडली असतील. तुम्ही हे उखाणे Facebook तसेच Whatsapp द्वारे तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता. जर तुमच्या कडे सुद्धा काही अशाच ukhane in Marathi for female marriage चा संग्रह असेल तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] किव्हा कंमेंट मध्ये नक्की शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले ukhane in Marathi for female new आमच्या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marathi ukhane for female, modern Marathi ukhane for female, ukhane Marathi for female, Marathi ukhane for female funny, smart Marathi ukhane female, ukhane in Marathi for female marriage, ukhane in Marathi for female new इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.

 

हे देखील वाचा

Best Marathi Ukhane For Pooja

Modern Marathi ukhane for female

Lagnasathiche Navin Ukhane In Marathi

Funny Ukhane In Marathi

Ukhane For Bride In Marathi

Ghas Bharavatanache Ukhane In Marathi

Best Marathi Ukhane list

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “नवरीचे उखाणे | Marathi Ukhane For Female | Ukhane in Marathi for female 2024”

Leave a Comment